पेठ तालुका स्तरीय विज्ञान मेळाव्यात डॉक्टर विजय बिडकर विद्यालयाचे सुयश
पेठ ता. १६ - आज अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा निरगुडे येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय पेठ तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा सन २०२४-२५ मध्ये डांग सेवा मंडळ नासिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ ची विद्यार्थिनी कु. संपदा गणेश शिरसाठ हिचा तालुक्यातून प्रथम क्रमांक आला व जिल्हास्तरावर निवड झाली. या स्पर्धेचा विषय होता कृत्रिम बुद्धिमत्ता. स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील सर पर्यवेक्षक श्री केला सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थिनीला उपशिक्षक श्री केदार सी डी, व श्रीमती गरुड एस के यांनी मार्गदर्शन केले.
