News Cover Image

डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग पेठ येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 
     पेठ -      दिनांक 15/08/2024 वार गुरूवार रोजी डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे 78 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.पाटील आर.एम.उपमुख्याध्यापक श्री धात्रक एस.सी.उपप्राचार्य सौ.आचार्य व्ही.सी.पर्यवेक्षक श्री.केला डी.जी. ज्येष्ठ शिक्षक श्री वेढने पी.आर.शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री मनोज गुंजाळ शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री.महेश डबे गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.के.टी.राऊत व इतर सर्व पालक आणि मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मवीर दादासाहेब बिडकर, डॉ विजय बिडकर व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मा प्राचार्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण श्रीमती.ब्राह्मणकर जे.आर.यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले.तसेच प्राचार्य श्री पाटील सर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पवार सर यांनी केले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.