डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित, डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे १५ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य श्री.राजेंद्र पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्रथम दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, डॉ. विजयजी बिडकर व स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. नंतर ध्वजाचे पूजन करून ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर पेठ शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थी,पालक,जेष्ठ नागरिक, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते ,पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. ,महेश डबे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.मनोज गुंजाळ तसेच पत्रकार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
