News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे शाळा प्रवेशोत्सव व पुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे शाळा प्रवेशोत्सव व पुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न
पेठ ता. १५ - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉक्टर विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आज शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या दिवसाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. यात सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर एम सर उपमुख्याध्यापक श्री बुवा सर पर्यवेक्षक श्री केला डी जी सर श्री देशमुख के के श्री वेढणे पी आर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते शाळेच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांचे व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री पाटील सर यांनी विद्यार्थी व पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे व  चॉकलेट वाटप करण्यात आले. यावेळी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.