News Cover Image

शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्ष मा. श्रीमती हेमलताताई बिडकर यांची भेट

शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्ष मा. श्रीमती हेमलताताई बिडकर यांची भेट
पेठ- ता. १५- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची पूर्वतयारी म्हणून  शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती हेमलताताई बिडकर, अखिल विश्व गायत्री परिवार नाशिक विभागाचे अध्यक्ष श्री. जयंतीभाई नाई, संस्थेचे संचालक श्री अ.प्र देशपांडे सर यांनी भेट दिली.  सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. ताईसाहेब यांनी सर्व बाल वैज्ञानिकांचे कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक श्री पाटील आर एम, उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस, उपप्राचार्य श्रीमती पवार जे पी, श्री आहेर डी टी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षकांनी परिश्रम घेतले. त्यात श्री केला डी जी, श्री केदार सी डी, श्रीमती पवार एस सी, श्रीमती गरुड एस के या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.