News Cover Image

बाल दिन साजरा

बाल दिन साजरा
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस बाल दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. सर, उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना बाल दिनाचे महत्त्व व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याविषयी माहिती सांगण्यात   आली.