News Cover Image

राष्ट्रभाषा हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रभाषा हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,पेठ येथे राष्ट्रभाषा हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर. एम. सर तर प्रमुख पाहुणे म्हणून आय.डी.बी.आय. बँकेचे मॅनेजर श्री. जाधव साहेब होते. तसेच उपमुख्याध्यापक श्री सागर ए रम सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या हिंदी दिनानिमित्त वक्तृत्त्व स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, शेरो शायरी, नाटिका, इ. अनेक कार्यक्रम घेण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना आय.डी.बी.आय. बँकेकडून बक्षीसे देण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सोनवणे जे. के., श्री. पालवी के के, श्री आहेर एम डी या शिक्षकांनी परिश्रम घेतले.