News Cover Image

शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
पेठ, ता. १२- 
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ, येथे विद्यार्थ्यांच्या शोधक बुध्दीला चालना देण्याच्या व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची पूर्वतयारी म्हणुन विज्ञान छंद मंडळा मार्फत  शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या   कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यालायचे मुख्याध्यापक मा श्री.पाटील आर.एम.सर , उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम. सर, पर्यवेक्षक श्री.केला डी.जी. सर, उपप्राचार्य श्रीम.पवार जे.पी. मॅडम उपस्थित होते. या वेळी 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांनी एकूण 35 उपकरणे मांडली. तसेच एकूण 32 वैज्ञानिक रांगोळ्या काढण्यात आल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सर्व विज्ञान शिक्षकांनी मेहनत घेतली.