डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे आंतरशालेय किल्ले स्पर्धांचे आयोजन
पेठ, ता. १२- साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतिने डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे शालेय विद्यार्थ्यांमध्ये गौरवशाली इतिहासाची अोळख होणे व विद्यार्थ्यांमध्ये किल्ल्यासंबंधी जनजागृती करणे या उद्देशाने आंतरशालेय किल्ले तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी होती. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रतापगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी(२), तोरणा व जंजिरा असे एकुण सहा किल्ले बनविले. हे किल्ले बनविण्यासाठी श्री ज्ञानेश्वर सोनवणे, श्री परेश देसाई, श्री मनोज सौंदाणे, श्री अशोक जाधव यांनी मार्गदर्शन केले.
