४६ व्या पेठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डाॅ. विजय बिडकर विद्यालयाच्या उपकरणाला प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक
पेठ, ता. १२- आज झालेल्या ४६ व्या पेठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथील उपकरण 'ट्राॅफीक कंट्रोल' या उपकरणाचा द्वितीय क्रमांक आला आहे. हे उपकरण कु. उत्कर्ष ज्ञानेश्वर सोनवणे व कु. अनिरुध्द मनोज बकरे या विद्यार्थ्यांनी बनविला होते. यासाठी विज्ञान शिक्षक श्री केदार सी. डी. व श्रीमती गरुड एस.के. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष आदणीय श्रीमती हेमलताताई बिडकर, विद्यालयाचे प्राचार्य श्री. पाटील आर.एम. उपमुख्याध्यापक श्री. सागर ए. एम. पर्यवेक्षक श्री. केला डी.जी. सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
