डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी
पेठ - दिनांक 11/04/2025 वार शुक्रवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.मधुकर मोरे,उपप्राचार्य सौ.वसुधा आचार्य श्री प्रशांत वेढने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले.सर्वप्रथम श्री सोनवणे डी एन यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली.उपमुख्याध्यापक श्री.मोरे सर यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देऊन शिक्षणाचे महत्त्व सांगितले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
