मानवविकास अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप
पेठ - ता. 12 डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आज मानवविकास अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप कण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर एम तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्रीमती कळंबे मॅडम होत्या. या प्रसंगी एकूण 42 मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य श्रीमती आचार्य व्ही सी, पर्यवेक्षक श्री केला डी जी, श्री वेढणे पी आर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
