पेठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ. विजय बिडकर विद्यालयाला सुयश मिळाले.
पेठ, ता. १०- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ विद्यालयाला पेठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुयश प्राप्त झाले. आज पेठ तालुकास्तरीय ५२ वे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यात विद्यालयातील अनलिमिटेड रनिंग बट पोलुशन फ्री कार या उपकरणाला ५ वी ते ८ वीच्या गटात प्रथम प्राप्त झाला. हे उपकरण उत्कर्ष ज्ञानेश्वर सोनवणे या विद्यार्थ्याने तयार केले होते. या विज्ञान प्रदर्शनात उत्कर्ष ज्ञानेश्वर सोनवणे ( ८ वी) व श्रेयस बाळू ढाकणे (६ वी) याविद्यार्थ्यानी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक श्री चंद्रकांत केदार व श्रीमती सुवर्णा गरुड या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री पाटील आर एम, उपमुख्याध्यापक श्री मोरे एम एस, पर्यवेक्षक श्री केला डी जी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
