डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
पेठ, दि. 10 - डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डॉक्टर विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे महावाचन उत्सव 2024 अंतर्गत पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ व डॉ. विजय बिडकर विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ दिंडी चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक गटशिक्षणाधिकारी माननीय श्री. प्रशांत जाधव साहेब हे होते तर प्रमुख उपस्थिती विस्ताराधिकारी माननीय श्रीमती सुनीता जाधव मॅडम, विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर. एम. सर उपमुख्याध्यापक श्री धात्रक एस. सी. सर, पर्यवेक्षक श्री केला डी. जी. सर, श्री वेढणे पी. आर. सर होते. यावेळी सर्वप्रथम ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय श्री जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्येची देवता सरस्वती, कर्मवीर दादासाहेब बिडकर, डॉ. विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर दीप प्रज्जवलन करण्यात आले. नंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनस भेट दिली. नंतर ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होते तसेच विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षक श्री जाधव ए वाय, श्री वाघमारे जे. एच., श्री सोनवणे डी एन, श्रीमती हुंडीवाले ए बी, ग्रंथपाल श्री घरटे ए एल. वसतिगृह अधीक्षक श्री जितेंद्र सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.