News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
पेठ ता- १० - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. सर उपमुख्याध्यापक श्री धात्रक एस सी सर, पर्यवेक्षक श्री केला डी जी सर यांच्या मार्गदर्शनाने काढण्यात आली. या रॅलीला विद्यालयापासून सुरुवात झाली प्रत्येक विद्यार्थ्याने हातात तिरंगा घेऊन पेठ शहरातून हर घर तिरंगा घर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देऊन घरोघरी तिरंगा अभियान प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले.  या रॅलीसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वसतिगृह अधीक्षक श्री सूर्यवंशी जे.सी. श्री दोडे व्ही एस व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷