News Cover Image

जिल्हास्तरीय काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन

लोकहितवादी मंडळ नाशिक व निराधार स्वावलंबन समिती संचलित (निस्वास गुरुकूल) यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त जिल्हास्तरीय काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे अाॅनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा ५ वी व ६ वी, ७ वी व ८ वी, व ९ वी व १० वी गटात घेण्यात आली. सर्व प्रथम शाळास्तरावर घेऊन त्यातील प्रत्येक गटातून प्रथम तीन विद्यार्थ्यांची निवड करुन आज जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली.