डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,व्यवसाय अभ्यासक्रम विभाग,पेठ येथे क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन साजरा.
आज दिनांक 09/08/2023 वार बुधवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे *९ ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.एम.पाटील उपप्राचार्य श्री देशमुख के.के.प्रभारी उपप्राचार्य श्री वेढणे पी आर. यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.या प्रसंगी महाविद्यायतील विद्यार्थ्यांनी ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन या विषयी मनोगत व्यक्त केले.तसेच भारतास आत्मनिर्भर आणि विकसीत राष्ट्र बनविण्यासाठी पंचप्रण शपथ विद्यार्थी व शिक्षक यांनी घेतली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री पाटील सर यांनी आपल्या मनोगतातून थोर क्रांतिकारक यांच्या कार्याचा उजाळा विद्यार्थ्यांना करून दिला. शहिदांचे बलिदान कधीही वाया जाणार नाही यासाठी सर्व तरुणांनी नेहमी प्रयत्न करावेत व भारताला आत्मनिर्भर व विकसीत राष्ट्र बनविण्यासाठी सगळ्यांचे योगदान महत्वपुर्ण आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले.तसेच विद्यालय ते हुतात्मा स्मारक येथे रॅली चे आयोजन करून शहीद क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यात आली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.जे.सोनवणे यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
