News Cover Image

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन साजरा

पेठ- ता. ६ - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर.एम. यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा  महापरीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी बाबा साहेबांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून  प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री केदार सी. डी. यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी श्री पाटील आर. एम. यांनी. डॉ बाबासाहेब यांच्या कार्याचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन श्री पगार सी बी. यांनी केले.