पेठ -दिनांक 10/07/2025 वार- गुरुवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय पेठ येथे गुरुंविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती, महर्षी व्यास आणि आदिवासी दुर्गम भागात ज्ञानगंगा पोहचविणारे डांग सेवा मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. निसर्गाकडून समानता, निस्वार्थवृत्ती सेवाभाव, परोपकार अशी मूल्य शिकायला मिळतात म्हणून निसर्ग हा गुरु या संकल्पनेतून गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सर्वांनी मिळून वृक्ष संवर्धन प्रतिज्ञा घेतली व प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा पन केला. यावेळी विद्यार्थी मनोगत घेण्यात आले. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती. व्ही.सी. आचार्य व उपमुख्याध्यापक श्री. डी.जी.केला यांनी आपल्या मनोगतातून गुरू परंपरा व गुरूंचे महत्त्व याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य श्री.ए.एल. नंदन यांनी गुरूंचे मानवी जीवनातील महत्त्व आणि वृक्षांचे महत्त्व याविषयी मनोगत व्यक्त केले. श्री.जे.एच. वाघमारे यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
