News Cover Image

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे क्षेत्रभेटीचे आयोजन

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे क्षेत्रभेटीचे आयोजन
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन शिक्षण मिळावे, तसेच एखाद्या उद्यागाची माहिती व्हावी या उद्देशाने क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. ही क्षेत्रभेट पेठ तालुक्यातील BAIF या ठिकाणी नेण्यात आली. याठिकाणी काजु प्रक्रिया उद्योग आहे, तसेच शेतक-यांसाठी व तरूणांसाठी  अनेक प्रकारच्या प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येते. येथे सर्व प्रथम येथील प्रमुख मा. श्री साने साहेब, मा.श्री सुधाकर बाबर साहेब, मा.श्री. माने साहेब यांनी विद्यार्थ्यांना संस्थेची व तेथील सर्व कार्यपद्धतीची संपुर्ण माहिती करुन दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रकल्प दाखवण्यात आला. नंतर विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आनंद लुटला. 
     ही क्षेत्रभेट मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम.सर, उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम.सर., पर्यवेक्षक श्री. केला डी.जी.सर तसेच सहल प्रमुख श्री जाधव ए.वाय यांच्या मार्गदर्शनाने व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या संपन्न झाली.