भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
पेठ, ता. ६ डिसेंबर - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे महामानव, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर. एम. सर होते. यावेळी सर्वप्रथम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांची वक्तृत्त्व स्पर्धा घेण्यात आली. नंतर शिक्षकांनी आपल्या मनोगतातुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्याचा परिचय करुन दिला. त्यात श्री केला डी जी, श्री केदार सी डी, श्री अहिरे बी एस, यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी आध्यक्षीय मनोगतातुन डाॅ. आंबेडकरांच्या कार्याचा परिचय श्री पाटील सरांनी करुन दिला. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांने डाॅ. बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करावे असा संदेश दिला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सोनवणे ज्ञानेश्वर यांनी केले तर आभार श्री पगार सी बी यांनी मानले.
