News Cover Image

'वाचू या आनंदे' पुस्तक वाचनावर आधारीत परीक्षा संपन्न

'वाचू या आनंदे' पुस्तक वाचनावर आधारीत परीक्षा संपन्न

पेठ, ता. ६- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान, नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी, वाचन संस्कृती जोपासावी या उद्देशाने पुस्तक वाचनावर. आधारीत 'वाचू या आनंदे' परीक्षा आज घेण्यात आली या परीक्षेसाठी ५ वी ते ९ वी चे एकुण ५८ विद्यार्थी बसले होते.