News Cover Image

शिक्षक दिन उत्साहात साजरा

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री पाटील आर.एम. होते. यावेळी एका दिवसाचे सर्व अध्यापनाचे कार्य विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. या निमित्ताने पर्यवेक्षक श्री केला डी जी, श्री कुलकर्णी एस एस, श्री केदार सी डी, श्रीमती पवार एस सी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी श्री पाटील सरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.देवेंद्र सोनवणे व हिमांशू भुसारे यांनी केले. तर कु. गीता मोंढे हिने आभार मानले.