डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
पेठ -दिनांक 14/04/2025 वार सोमवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.राजेंद्र पाटील,उपमुख्याध्यापक श्री.मधुकर मोरे, पर्यवेक्षक श्री.दिलीप केला, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख श्री प्रशांत वेढणे यांच्या प्रमुख उपस्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली.तसेच शिक्षकांमधून श्री.सोनवणे डी.एन.श्री.केदार सी.डी.श्री.सोनवणे एस.जे.यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला.पर्यवेक्षक श्री.केला सर यांनी डॉ.बाबासाहेबांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा परिचय करून दिला.तसेच उपमुख्याध्यापक श्री.मोरे सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून शिक्षणाचे महत्त्व सांगितले.त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य श्री.पाटील सर यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देऊन राज्यघटनेचे महत्त्व सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोनवणे एस.जे.यांनी केले.व आभार श्री.वाघमारे जे.एच.यांनी मानले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
