News Cover Image

स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर यांचा स्मृती दिवस साजरा

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे
स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर यांचा स्मृती दिवस साजरा
      पेठ -  दिनांक 04/10/2024 वार शुक्रवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आरोगयदुत, दीन दुबळ्यांचे कैवारी, क्रीडाप्रेमी, वाचनाचे व्यासंगी, स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर यांचा स्मृती दिवस साजरा करण्यात आला. याकार्यक्रमाचे अध्यक्ष  विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.मोरे एम.एस. सर होते. उपप्राचार्य श्रीमती आचार्य व्ही.सी. पर्यवेक्षक  श्री केला डी जी. व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख श्री वेढणे पी.आर. यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. साहेबांच्या पुतळ्याचे व प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी स्वर्गीय विजय बिडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. तसेच शिक्षक श्री सोनवणे एस जे, श्री.वेढणे सर व श्रीमती आचार्य मॅडम, श्री ज्ञानेश्वर सोनवणे, श्री बाबाजी आहिरे, यांनी डॉ विजयजी बिडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला व अनुभव कथन केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री.मोरे सर यांनी अध्यक्षीय भाषणातून स्वर्गीय विजयजी बिडकर यांच्या  जीवन कार्याचा सविस्तर परिचय करुन दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस.जे.सोनवणे व श्री जनार्दन वाघमारे यांनी केले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.