News Cover Image

डाॅ. विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

डाॅ. विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
पेठ, ता. ४- डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल, पेठ येथे डांग सेवा मंडळ संस्थेचे माजी सचिव, क्रीडाप्रेमी, निसर्गप्रेमी, वाचनाचे व्यासंगी, दिन दुबळ्यांचे कैवारी, आरोग्यदुत, स्वर्गीय डाॅ. विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पाटील आर. एम. सर होते. यात सर्व प्रथम विद्यालयातील सर्व क.म.वि. शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थित डाॅ. विजयजी बिडकर यांच्या पुतळ्याचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी., पर्यवेक्षक श्री. केला डी.जी., श्रीमती आचार्य व्ही.सी., श्रीमती हाडपे एम. सी., श्रीमती पवार एस.सी. यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यातुन डाॅ. साहेबांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करुन दिला. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी., पर्यवेक्षक श्री. केला डी.जी., श्री वेढणे पी.आर. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सोनवणे एस. जे. व श्री कुलकर्णी एस.एस यांनी केले व आभार श्री पगार सी.बी. यांनी मानले.