डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , व्यवसाय अभ्यासक्रम विभाग, पेठ येथे शिक्षक पालक मेळावा आयोजन
आज दिनांक 04/08/2023 वार शुक्रवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे *शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. मनोज गुंजाळ शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री.महेश डबे विद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.एम.पाटील उपप्राचार्य श्री देशमुख सर पर्यवेक्षक श्री केला सर उपप्राचार्य श्री वेढणे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री पाटील सर यांनी केले त्यावेळी त्यांनी शाळेतील विविध उपक्रम आणि शाळेतील विविध स्पर्धा याबद्दल माहिती दिली.तसेच पालकांचे सर्व समस्या ऐकून घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व उपाययोजना करू असे आश्वासन पालकांना दिले. शाळा समितीचे उपाध्यक्ष श्री मनोज गुंजाळ यांनीही विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते असेही मनोगतातून सांगितले तसेच विद्यार्थी गैरहजर ,शाळेबाहेरील विद्यार्थी समस्या,मोबाईल वापराबाबत काही समस्या या विषयावर चर्चा करण्यात आली.तसेच विद्यार्थी पालक श्री शेख यांनीही शाळेतील सर्व उपक्रम व शाळेतील नियोजन याबद्दल कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकास हा शाळेतच होतो असे प्रतिपादनही यावेळी केले.विद्यार्थ्यांना वेळेवर बसेस उपलब्ध व्हाव्यात याबद्दल ही त्यांनी प्राचार्य यांना विनंती केली.पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे व दररोज शाळेत पाठवावे असेही यावेळी सांगितले. पर्यवेक्षक श्री.केला सर यांनीही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्व शिक्षक नेहमीच प्रयत्नशील आहेत असे यावेळी सांगितले.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्री एस.जे.सोनवणे सर यांनी केले. व आलेल्या सर्व विद्यार्थी पालक यांचे आभार श्री एस.एस.कुलकर्णी सर यांनी मानले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
