News Cover Image

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय  पेठ येथे
 राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी. 
      पेठ -दिनांक 02/10/2024 वार बुधवार रोजी डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.मोरे एम.एस.पर्यवेक्षक श्री.केला डी.जी.उपप्राचार्य सौ.आचार्य व्ही.सी.व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख श्री वेढणे पी.आर.यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छ केला.त्यानंतर विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.तसेच शिक्षिका श्रीमती हाडपे एम.सी.लिपिक श्री.बाबाजी अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच पर्यवेक्षक श्री केला सर यांनीही महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला .कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री.मोरे सर यांनी अध्यक्षीय भाषणातून गांधीजी व शास्त्रीजींच्या जीवन कार्याचा सविस्तर परिचय करुन दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी.एन.सोनवणे यांनी केले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.