News Cover Image

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग,पेठ येथे
 महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी   
    
आज दिनांक 02/10/2023 वार सोमवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माझी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.एम.पाटील उपमुख्याध्यापक श्री.ए.एम.सागर,पर्यवेक्षक श्री.डी.जी.केला, वेढणे सर हे प्रमुख उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच शिक्षकांमध्ये श्री. सी.डी.केदार,श्री.एस. एस.कुलकर्णी श्री.एस.जे.सोनवणे डॉ.एम.सी.हाडपे श्री.पी.आर.वेढणे यांनी महात्मा गांधी व लाल लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा उजाळा आपल्या मनोगतातून करून दिला.यानंतर विद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.एम.पाटील सर यांनी ही आपल्या मनोगतातून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याचा उजाळा करून दिला.तसेच जीवनात सत्याच्या मार्गाने मिळालेले यश हे दीर्घकाळ टिकते असे यावेळी त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी.एन.सोनवणे यांनी केले.तसेच रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम हे गांधीजींचे भजन गाऊन कार्यक्रमाची सांगता श्री सी.बी.पगार सर यांनी आभार मानून केली.यावेळी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.