News Cover Image

शासन आपल्या दारी अंतर्गत🌹 महसूल सप्ताह निमित्त शासकीय कागदपत्रे वाटप व मतदार जागृती मार्गदर्शन व नाव नोंदणी अभियान

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , व्यवसाय अभ्यासक्रम विभाग, पेठ येथे
 शासन आपल्या दारी अंतर्गत🌹 महसूल सप्ताह निमित्त शासकीय कागदपत्रे वाटप व मतदार जागृती मार्गदर्शन व नाव नोंदणी अभियान
आज दिनांक 02/08/2023 वार बुधवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे महसूल सप्ताह निमित्त शासकीय कागदपत्रे वाटप कार्यक्रम अंतर्गत मा .श्री दांडेकर साहेब (उपजिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी पेठ), मा.श्री. अनिलजी पुरे साहेब (तहसीलदार पेठ), मा .श्री.मधुकर गवांदे साहेब (नायब तहसीलदार पेठ ) प्राचार्य श्री.आर.एम.पाटील उपप्राचार्य श्री देशमुख सर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना अधिवास प्रमाणपत्र,जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला यांचे यावेळी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.तसेच मा उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते मतदार नाव नोंदणी ही करण्यात आली .यावेळी मा.तहसीलदार श्री पुरे साहेबांनी विद्यार्थ्यांना कागदपत्रांचे महत्त्व आणि मतदान आपला अधिकार याविषयी माहिती दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय सोनवणे यांनी केले.यावेळी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.