News Cover Image

वक्तृत्व स्पर्धा

पेठ, ता. ११- साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक व चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यास्पर्धेत डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथील शिक्षकांनी घवघवीत यश संपादन केले. 
यात 
प्राथमिक गटात श्री. जाधव निलेश कैलास- द्वितीय क्रमांक
माध्यमिक गटात श्री वाघमारे जनार्दन हिरामण - द्वितीय क्रमांक
श्रीमती सुरेखा चतरसिंग पवार - तृतीय
चतुर्थश्रेणी कर्मचारी गट - श्री बाबाजी सखाराम अहिरे - तृतीय
विजेत्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे संस्थेच्या अध्यक्ष मा. हेमलताताई बिडकर, सचिव मा. ऍड. श्रीमती मृणालताई जोशी सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री पाटील आर एम, उपमुख्याध्यापक श्री मोरे एम एस, पर्यवेक्षक श्री केला डी जी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.