डाॅ. विजय बिडकर विद्यालय,पेठ येथे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.
पेठ, ता. १- डांग सेवा मंडळ, नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत स्वच्छता ही सेवा 'कचरामुक्त भारत' अभियान अंतर्गत स्वच्छाता मोहिम राबवण्यात आली. यावेळी सर्व प्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. सर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. याशपथचे वाचन श्री पठाडे सी.ए. यांनी केले. त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी विद्यालयाचा संपुर्ण परिसर व विद्यालयापासून तर जुना बसस्थानका पर्यंतचा सर्व परिसर स्वच्छ केला. या वेळी उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम., उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी., पर्यवेक्षक श्री. केला डी.जी., व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख श्री वेढणे पी.आर. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
