डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , व्यवसाय अभ्यासक्रम विभाग, पेठ येथे
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
आज दिनांक 01/08/2023 वार मंगळवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.एम.पाटील सर,उपप्राचार्य श्री के.के. देशमुख सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानिमित्ताने महाविद्यालयात वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
