*🌹अखिल भारतीय महिला परिषद (AIWC) नवी दिल्ली व सिन्नर शाखा अंतर्गत शारदा महिला मंडळ पेठ यांच्या विद्यमाने 🌹*
*डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे शताब्दी वर्षानिमित्त दि.22 नोव्हेंबर 2026 वार रविवार रोजी वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा व शारदा महिला मंडळाच्या संस्थापिका मा.हेमलताताई बिडकर प्रमुख उपस्थिती सिन्नर महिला मंडळांच्या अध्यक्षा सौ.उज्ज्वला खालकर, पेठ शारदा महिला मंडळांच्या अध्यक्ष सौ.माधुरी गाडगीळ व सचिव सौ.रेखा पठाडे* विद्यालयाचे प्राचार्य अशोक नंदन उपमुख्याध्यापक दिलीप केला पर्यवेक्षक कैलास देशमुख हे उपस्थित होते.सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संजय सोनवणे यांनी केले.या कार्यक्रमाच्या *अध्यक्षा मा. ताईसाहेब यांनी महिला सक्षमीकरण व जनजागृती या विषयी मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सुरुवात केली* या वॉकेथॉन कार्यक्रमासाठी विद्यालयातील एकूण 100 विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवून विद्यालय ते हुतात्मा स्मारकापर्यंत फेरी काढून जनजागृती केली.त्यानंतर विद्यार्थिनींना शारदा महिला मंडळ यांच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी वसतिगृह अधिक्षक जितेंद्र सूर्यवंशी सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
