डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
*डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याय पेठ* येथे
*80 वा स्वातंत्र्य दिन* उत्साहात साजरा
*पेठ* : दि. 15/08/2026 वार शनिवार रोजी *डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे 80 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला* यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ए.एल.नंदन पर्यवेक्षक के.के.देशमुख गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व पालक आणि मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत मा प्राचार्य नंदन सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण भोये डी.एन.यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर कर्मवीर दादासाहेब बिडकर,स्वर्गीय डॉ. विजय बिडकर व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगीत कवायत सादर केले.याप्रसंगी प्राचार्य नंदन सर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठाडे सर यांनी केले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी वसतिगृह अधिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
