News Cover Image

डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याय पेठ येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला

पेठ - दिनांक 05/09/2025 रोजी डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याय पेठ येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती - शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत मुख्याध्यापक ते शिपाई अश्या सर्वच पदांचे कामकाज स्वतः पार पाडले आणि शालेय कामकाजासह अध्यापनाचा अनुभव घेतला. त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य श्री.अशोक नंदन सर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात सर्वप्रथम प्रतिमापूजन घेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी मुख्याध्यापिका राधिका कस्तुरे, उपमुख्याध्यापिका मयुरी वाघमारे, श्रावणी गणोरे, पर्यवेक्षक मृणाल भसरे, दर्शन पवार या सर्वांनी तसेच विद्यार्थी शिक्षकांनी सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प व पेन भेट देऊन स्वागत सत्कार केला. विद्यार्थी शिक्षकांनी त्यांना अध्यापनात आलेले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले तसेच सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांपैकी श्री.चंद्रकांत केदार, श्रीमती. सुरेखा पवार, श्री.निलेश जाधव, श्री.जनार्दन वाघमारे आणि उपमुख्याध्यापक श्री.दिलीप केला सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यात त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी आयुष्य घडविण्यासाठी शिक्षकाची भूमिका किती महत्त्वाची असते याविषयी मार्गदर्शन केले तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. प्राचार्य श्री.अशोक नंदन सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक दिनाची विद्यार्थी उपमुख्याध्यापिका मयुरी वाघमारे हिने केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी पर्यवेक्षिका मृणाल भसरे हिने केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.