News Cover Image

डॉ.विजय बिडकर विद्यालय पेठ येथे शैक्षणिक पावसाळी सहलीचे आयोजन

पेठ दि.19/09/2025 रोजी विद्यालयात शैक्षणिक पावसाळी सहलीचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थी या सहलीमध्ये सहभागी झाले. सहल जाण्यापूर्वी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. अशोक नंदन सर व उपमुख्यद्यापक श्री. दिलीप केला सर यांनी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची मीटिंग घेऊन सहल शिस्तीत व सुखरूप पार पाडण्यासंदर्भात सूचना दिल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना पावसाळी सहलीचे महत्त्व सांगून शिस्ती संदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन ठीक 08:30 वाजता सहल विद्यालयातून निघाली. सहलीला जात असताना संगमेश्वर येथील मंदिरात सर्व विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर सहलीचे निश्चित ठिकाण खंबाळे परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी सर्व विद्यार्थी व शिक्षक पोहोचले. विद्यार्थ्यांनी निसर्गाचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केले व निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला. त्यानंतर सर्वांनी आणलेले डबे खाल्ले, थोड्या विश्रांतीनंतर परिसराची साफसफाई करण्यात आली. सर्व विद्यार्थी एकत्र करून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कला सादर केल्या. निसर्गाचे महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर सामूहिक नृत्य घेण्यात आले. नंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक आनंदाने सुखरूपणे शाळेत पोहोचले. आजच्या या पावसाळ्यात सहलीस विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.