News Cover Image

राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त तिरंगा इंद्रधनुष्य थाळी चे प्रदर्शन

राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त तिरंगा इंद्रधनुष्य थाळी चे प्रदर्शन
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना व शालेय पोषण आहार योजना अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह निमित्त  तिरंगा इंद्रधनुष्य थाळी तयार करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांना सलाडचे महत्त्व व पोषण मूल्य बाबत अवगत करण्यात आले. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. सर होते. यावेळी कु. राधिका कस्तुरे, जागृती इंपाळ, ईश्वरी काळे यांनी फळे, भाज्या व अन्नधान्य यातील घटकांविषयी माहिती दिली. त्यानंतर श्री केला डी जी सर यांनी आपल्या मनोगतातुन सर्व फळे, भाज्या, कडधान्य इ. मध्ये  रंगानुसार असणारे आवश्यक घटक याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्री पाटील सर यानी पोषण माह चे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर श्री पगार सी.बी, श्री जाधव ए वाय, श्रीमती खंबाईत एच व्ही उपस्थित होते. या कार्यक्रमचे नियोजन विद्यालयातील पोषण आहार प्रमुख श्री सौंदाणे एम व्ही. व श्री पालवी के के यांनी केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. ७  वी च्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन 
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे शालेय पोषण आहार योजना अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह निमित्त  जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमचे नियोजन विद्यालयातील पोषण आहार प्रमुख श्री सौंदाणे एम व्ही. व श्री पालवी के के यांनी केले. 

राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त पोषण मूल्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे शालेय पोषण आहार योजना अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह निमित्त  पोषण मूल्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. सर, होते. तर प्परमुख उपस्र्यथिती पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर होते. यावेळी श्री केला डी जी व श्रीमती पवार एस सी यांनी पोषण मूल्य या विषयावर मार्गदर्शन केले. शेवटी पाटील सर यांनी शालेय पोषण आहार योजनेविषयी माहिती दिली. यावेळी  सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमचे नियोजन विद्यालयातील पोषण आहार प्रमुख श्री सौंदाणे एम व्ही. व श्री पालवी के के यांनी केले.