News Cover Image

डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश

 पेठ - दि. 13/08/2025 रोजी एम.जे.एम. कॉलेज करंजाळी येथे झालेल्या पेठ तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथील 2 विद्यार्थिनी व 4 विद्यार्थी यांनी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून त्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.

14 वर्षाआतील मुले 
1) श्रेयस कचरु पवार(48 kg)

17 वर्षाआतील मुले 
1) पुरुषोत्तम रोहिदास  भोंडवे(55kg)
2) इस्तियाक एकबाल शेख(90 kg)

19 वर्षाआतील मुले 
1)कुमार रामदास वाघमारे(61kg)

19 वर्षाआतील मुली 
1) मनिषा धनराज गुंबाडे(50kg)
2) प्रियंका नामदेव वंजारे(55kg)
       वरील सर्व विजयी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मा.ताईसाहेब,उपाध्यक्ष मा. ठाकरे साहेब,सचिव मा.मृणालताई जोशी विद्यालयाचे प्राचार्य श्री नंदन सर, उपमुख्याध्यापक श्री.केला सर,पर्यवेक्षक श्री देशमुख सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विजेत्या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्री.पठाडे सर व श्री भामरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.