News Cover Image

स्व. कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव संपन्न

स्व. कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव संपन्न पेठ, दि. ४- डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या वतीने स्व. कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव संपन्न झाला. हा क्रीडा महोत्सव डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी मा. श्री. आर.आर. पाटील साहेब उपस्थित होते. यावेळी सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण, क्रीडा ज्योतप्रज्वलन, शांतीदूत संदेश, सामूहिक संचलन व क्रीडा शपथ घेण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या अधक्षा मा. ताईसाहेब यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून स्पर्धेचा हेतू व उद्देश सांगितला तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर काही खेळाडूंनी प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर प्रकल्प अधिकारी श्री पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व सर्व खेळाडूंनी खेळ भावनेने खेळावे असा मोलाचा संदेशही दिला. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री मनोज गुंजाळ, पालक - शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री महेश डबे, श्री प्रसन्न जोशी, श्री संकेत पाठक, श्री राजूदादा म्हसदे, श्री शाम जोशी, संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती हेमलताताई बिडकर, उपाध्यक्ष श्री दामोदर ठाकरे, सचिव मृणालताई जोशी, संचालक श्री चंद्रात्रे सर, श्री. देशपांडे सर, श्री अनिल पंडित सर, मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम., उपमुख्याध्यापक श्री मोरे एम. एस. पर्यवेक्षक श्री केला डी. जी. उपप्राचार्य श्रीमती आचार्य व्हीं सी. श्री वेढणे पी. आर. सर्व शाळा महाविद्यालय व आश्रमशाळा विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक, अधिक्षक श्री जितेंद्र सूर्यवंशी, श्री विनायक दोडे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सोनवणे ज्ञानेश्वर व श्री जनार्दन वाघमारे यांनी तर आभार श्री पाटील आर एम यांनी मानले. स्पर्धेचा निकाल कबड्डी मुले १) गिरिजादेवी प्राथ. माध्यमिक आश्रशाळा शिंदे (दि) - विजेता २) सिध्देश्वर प्राथ. व माध्यमिक आश्रमशाळा, सुळे - उपविजेता कबड्डी मुली १) माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे - विजेता २) जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मुल्हेर -उपविजेता उत्कृष्ट संचलन १) एकलव्य प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, उंबरठाण - प्रथम २) गिरीजादेवी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा शिंदे (दि)- द्वितीय ३) ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आंबेगण - उत्तेजनार्थ