News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

पेठ -दि.01/08/2025 वार- शुक्रवार रोजी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य श्री.अशोक नंदन सर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.यात यशस्वी विद्यार्थी 
5 वी ते 7 वी गट -
1.कुमुद भोये  2.अनन्या जाधव
3.असबाह शेख 4.किर्ती जाधव(उत्तेजनार्थ)
8 वी ते 10 वी गट -
1.अथर्व करवंदे 2.श्रावणी राऊत 
3.श्रावणी पवार 4.रत्ना गालट(उत्तेजनार्थ)
  शिक्षकांपैकी श्री.निलेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उपमुख्याध्यापक श्री.दिलीप केला सर यांनी दोघेही महान विभूतिंच्या कार्याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य श्री.अशोक नंदन सर यांनी दोघेही महान व्यक्तीबद्दल विस्तृत माहिती देऊन त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन श्री.जनार्दन वाघमारे यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण श्रीमती.ब्राम्हणकार मॅडम व श्री. निलेश जाधव यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.