News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे मतदान दिवस साजरा

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे जागतिक मतदान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री पाटील आर. एम. होते. यावेळी विद्यार्थ्यांना श्री आहेर एम. डी. व पर्यवेक्षक श्री केला डी जी यांनी विद्यर्थ्याना मतदानाचे महत्त्व सांगितले. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम. उपप्राचार्य श्रीमती पवार जे पी., श्री वेढणे पी आर., सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.