News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे शाळास्तरीय काव्य वाचन स्पर्धा संपन्न

 डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे शाळास्तरीय काव्य वाचन स्पर्धा संपन्न
पेठ ता. 22- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे लोकहितवादी मंडळ नाशिक यांच्या वतीने कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  ही स्पर्धा आज विद्यालयात घेण्यात आली.  यात पाचवी ते बारावी पर्यंतच्या 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य श्रीमती पवार जे पी व पर्यवेक्षक श्री केला डी जी होते या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम श्री सोनवणे एस जे  व श्री कुलकर्णी एस एस यांनी केले. यावेळी श्री जाधव ए वाय, श्री सौंदाणे एम व्ही, श्री शिंदे एन. ए . उपस्थित होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री सोनवणे ज्ञानेश्वर यांनी केले. 
यात पुढील विद्यार्थी विजेते झाले.
५ वी ते ६ वी गट
१) गवळी गणेश लालजी प्रथम ५ वी 
२) भोये मेघना रोहिदास द्वितीय ५ वी
३) भोये सचिन शशिकांत तृतीय  ६ वी
७ वी ते ८ वी गट
१) बोराडे साई भूषण प्रथम७ वी
२) सोनवणे चंचल चंद्रकांत द्वितीय ७ वी 
३) सोनवणे उत्कर्ष ज्ञानेश्वर तृतीय ७ वी
4) दोडे वरद विनायक तृतीय ७ वी
९ वी ते १० गट
१) शिरसाठ संपदा गणेश प्रथम ९ वी 
२) भारती प्रतीक महेश- द्वितीय ९ वी
३) अहिरे सरिता सुकदेव तृतीय ९वी
११ वी १२ वी गट
१) गायकवाड सोनाली जगन प्रथम ११ वी 
२) पठाडे प्रांजल शशिकांत द्वितीय ११ वी
३) बागुल नंदिनी मनोहर तृतीय ११ वी