News Cover Image

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

 डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम  यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. नंतर श्री केला डी जी.,कुलकर्णी एस.एस. यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी श्री सागर ए.एम. यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांच्या कार्याचा  परिचय करून दिला.  सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.