News Cover Image

जागतिक एडस् दिन साजरा

जागतिक एडस् दिन साजरा
     पेठ ता. १- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे आज दि. १ डिसेंबर २०२२ रोजी जागतिक एडस् दिन साजरा करण्यात आला. यात सर्व प्रथम पेठ शहरातुन विद्यार्थ्यांची एडस् जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन जनजागृती केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना एडस् या आजाराविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. सर होते. याप्रसंगी श्री केला डी जी, श्री केदार सी डी, श्रीमती पवार एस सी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाटील सर यांचे अध्यक्षीय मनोगत झाले. त्यात त्यांनी एडस् आजाराविषयी माहिती दिली. त्यांनर एडस् दिनानिमित्त शपथ घेण्यात आली. आजच्या या  एडस् दिनानिमित्ताने विद्यालयात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व  विद्यार्थी उपस्थित होते.